पनवेल दि.08 (संजय कदम) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या पासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी पनवेल शहर पोलिसांनी शहरांनी विविध भागातून संचलन करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. जर सायंकाळी 5 नंतर घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन शहरातून करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सायंकाळी 5 नंतर कोणीही रस्त्यावर येऊ नये, अशा प्रकारच्या व्यक्ती रस्त्यावर फिरताना आढळ्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या काळात सर्व दुकाने बंद राहतील फक्त हॉस्पिटल, मेडिकल स्टोर ही दुकानेच सुरू राहणार आहेत. इतर व्यवहार दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू करून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्या काळात नागरिकांनी सामानाची खरेदी करावी. तरी नागरिकांनी आपल्या कुटूंबासह घरातच राहून याचा सामना करूयात असे आवाहनसुद्धा पोलिसांकडून करण्यात आले आहे.