पनवेल,दि.१४ : पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून लोकसहभागातून ढोल-ताशा, चित्ररथासहीत भव्य मिरवणूक पनवेल शहरात काढण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेने निबंध,वक्तृत्व स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
सकाळी साडे सात वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ.वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे,उपलेखाधिकारी संदिप खुरपे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी अभिवादन केले.
यानंतर ढोल-बॅण्ड पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित चित्ररथ बनविण्यात आले होते. याबरेाबरच सावित्रीबाई महिला मंडळ,रमाबाई महिला मंडळ यांनी सामुहिक गायन केले.या मिरवणूकीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ करण्यात आली.पुढील समारोपाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये घेण्यात आला.
याठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी महापालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक,विविध संस्थांचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!