पनवेल दि.१०: पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ब’ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या रूचिता लोंढे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा ३८२० मतांनी पराभव केला. दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी काल गुरुवार, ९ रोजी जानेवारी मतदान झाले. भाजपच्या वतीने मुग्धा लोंढे यांच्या कन्या रुचिता लोंढे आणि महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांच्यात झालेल्या या लढतीत रुचिता लोंढे विजयी झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीत केवळ ३१.०३ टक्के मतदान झाल्याने मतदारांचा उत्साह देखील कमी दाखवला होता. एकूण २८ हजार ३५० मतदारांपैकी केवळ ८ हजार ७९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी पनवेलमधील आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मतमोजणीला सुरवात झाली असता. पहिल्या फेरीपासून भाजपची उमेदवार रुचिता लोंढे या आघाडीवर होत्या. पहिल्या फेरी दरम्यान भाजप उमेदवार लोंढे यांना १ हजार ६६२ मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल कुरघोडे यांना ६४१ इतकी मते मिळाली. तर दुसऱ्या फेरीत देखील लोंढे याच आघाडीवर असून दुसऱ्या फेरीत त्यांना १ हजार ८२९ मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल कुरघोडे यांना केवळ ६४१ मतांवर समाधान मानावे लागले. तर तिसऱ्या फेरीत देखील लोंढे यांनी आघाडी राखत २ हजार ०३६ मते मिळवून आघाडी कायम ठेवली. या फेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवार कुरघोडे यांना ५९३ इतकी मते मिळाली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एकाही फेरीत ७०० चा आकडा पार करता आला नाही, तर शेवटच्या चौथ्या फेरीत लोंढे यांनी ७०४ मते मिळवत महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल कुरघोडे यांच्यावर ३ हजार ८४४ मतांनी आघाडी घेत विजय मिळवला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!