पनवेल दि.१२: दिवाळी निमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील महिला आणि मुलींसाठी दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत ‘रांगोळी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
कोरोना योद्धा, आकर्षक दीपोत्सव, प्रदुषण विरहित दिवाळी, आणि पनवेल नगरीतील ऐतिहासिक गोष्टी, या चार विषयांवर हि स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिस तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. एका रांगोळीसोबत केवळ एक स्पर्धक ग्राह्य धरला जाणार असून स्पर्धकाने रांगोळी काढताना आणि पूर्ण झाल्यावर असे दोन फोटो, नवा, मोबाईल क्रमांक, पत्ता, प्रभाग क्रमांक याचा उल्लेख करून ९९२०७६५७६५ या क्रमांकावर व्हाट्सऍप करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.