पनवेलदि.२१: भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावली निमित्त ‘ भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा येथे महाराजांना अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम महाडिक, युवा नेते संजय जैन, गौरव कांडपिळे, चिन्मय समेळ, केदार भगत, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, विवेक होन, शावेज रिझवी, आत्मनिर्भर भारतचे रायगड जिल्हाध्यक्ष आकाश भाटी, नूतन पाटील, यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ०७ हजार रुपये तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे ०५ हजार व ०३ हजार रुपये असून एकूण ३० हजार रुपयांची २० उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. एकूण विजेत्यांना ४५ हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषक ने सन्मानित करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नावनोंदणीची अंतिम तारीख ०२ नोव्हेंबर आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रोहित जगताप (८६९१९३०७०९), अजिंक्य भिडे (८८५०६४४२०७), देवांशू प्रभाळे (८४३३५१३५४०), किंवा अनिकेत भोईर (९९३०१०४४९९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!