पनवेल दि.१५: भारतीय जनता पार्टी पनवेल प्रभाग क्रमांक १९ तर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा एकूण ८ गटामध्ये असून पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. १९ साठी मर्यादित आहे. गट 0१ मध्ये ७ वर्षाखालील मुले (भाषा – मराठी), गट 0२ मध्ये ७ वर्षाखालील मुली (भाषा – मराठी), गट 0३ मध्ये ८ ते १२ वर्षाखालील मुले (भाषा – मराठी), गट 0४ मध्ये ८ ते १२ वर्षाखालील मुली (भाषा – मराठी), गट 0५ मध्ये ७ वर्षाखालील मुले (भाषा – इंग्लिश), गट 0६ मध्ये ७ वर्षाखालील मुली (भाषा – इंग्लिश), गट 0७ मध्ये ८ ते१२ वर्षाखालील मुले (भाषा – इंग्लिश) व गट 0८ मध्ये ८ ते १२ वर्षाखालील मुली (भाषा – इंग्लिश) अशा स्वरूपात आहे.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी व्हिडीओ जास्तीत जास्त २ मिनिटाचा पाठवावा. त्यापेक्षा जास्त असल्यास ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच सुस्पष्ट, पुरेसा उजेड असणारा व स्पष्ट आवाज असणारा व्हिडीओ असावा. आपल्या भाषणातील विषयाचा आशय, भाषाप्रभुत्व, आवाजातील चढ-उतार, विषय- तयारी, हावभाव स्पर्धकांने केलेली वेशभूषा या गोष्टींचा विचार करून विजेते निश्चित केले जाणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या सुरूवातीला आपले नाव सांगुन भाषणाला सुरूवात करावी. मूळ व्हिडीओ मध्ये कुठेही एडिट केलेले आढळल्यास प्रवेशिका बाद करण्यात येईल. व्हिडीओ पाठविण्याची अंतिम तारीख १७ मे २०२० च्या रात्री ०९.०० वाजेपर्यत ७५०२१००१०० किंवा ७७५७०००० या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
![](https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2020/05/images-3.jpeg)