पनवेल दि.१४: विभाजन विभीषीका स्मृती’ दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेलच्यावतीने विभाजन विभीषिका संदर्भात दोन दिवसीय चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनीचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व त्यागले त्यांचे स्मरण सतत होत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करून साजरा होत आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात येत आहे. फाळणीत विस्थापित झालेल्या आणि प्राण गमावलेल्या लाखो बंधू-भगिनींच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ या दिना दिनानिमीत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आले आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात फाळणीच्या भयंकर स्मरण दिनाची कल्पना नवीन पिढीला मिळावी यासाठी दोन दिवसीय चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्र्यविरांच्या कुटूंबीयांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये स्व. सदाशिव शांताराम ठाकूर, स्व. शांतीलाल चुनीलाल गुगळे, स्व. बाबुसिंग उर्फ प्रल्हादसिंग नारायणसिंग ठाकूर, स्व. किसनराव एकनाथ जगनाडे, स्व. परशुराम महादेव गोडबोले, स्व. शांताराम अच्युत वालावकर, स्व. रामकृष्ण गणेश आपटे, स्व. मारुती मुकुंद पन्हाळे, स्व. मुळशंकर माधवजी मेहता, स्व. शंकर चिंतामण तथा बापुसाहेब खरे, स्व. दलीचंद लालचंद कोठारी, स्व. दत्तात्रय वामन गोखले, हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे, स्व. दिगंबर गणेश गवाणकर यांच्या कुटूंबीयांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व जिल्हा प्रवक्ते प्रकाश बिनेदार, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचीता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. तत्पुर्वी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!