पनवेल दि.२८: भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्या अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारणी बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. ही बैठक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीमुळे खोळंबलेला विकास अर्थात मागील अडीच वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार असल्याची ग्वाही देत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वांनी साजरा करुन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्वांनी घरावर झेंडा फडकवण्याचे आवाहन केले.
पनवेल मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्तर रायगड भाजप अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारणी ैठक आयोजीत करण्यात आली होती. ही बैठक जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून यावेळी त्यांनी अनेक विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव मन्सूर पटेल, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जासिम गॅस, पनवेल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक मुकीत काझी, पापा पटेल, तळोजेचे माजी सरपंच मुनाफ पटेल, जॅनब शेख, समीना साठी, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅडव्होकेट इर्शाद शेख, जवाद काझी, निसार सय्यद, माजी नगरसेवक मेराज शेख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रात जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. इर्शाद शेख यांनी उत्तर रायगड जिल्ह्यातील सर्व मुस्लीम समाजाच्या कर्बस्थानांच्या संरक्षण भिंती व त्यांच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा या मागणीचे निवेदन आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केलं.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हाणाले की, हा देश आपल्या सर्वांचा आहे. या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी काम करत आहे. सर्व धार्मांचा आदर राखला गेला पाहिजे विशेष करुन जो मुस्लीम सजाम अनेक वर्षांपासून देशात राहत आहे त्या समाजाविरोधात कोनी वक्तव्य केलं असेल तर त्यांच्या कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या मध्ये पक्षात कोणतेही दुमत नाही असे सांगीतले तसेच देशाच्या स्वतंत्र्याचा अमृत महोत्वाव आपल्या सर्वांचा आहे त्यामुळे 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत प्रत्येक घरात झेडा फडकवला पाहिजे असे आवाहन केले. तर माजी नगरसेवक मुकीत काझी यांनी मुस्लीम समाज हा भारतीय जनता पार्टी बरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन केल.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!