पनवेल दि.२७ : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील हद्दीत पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे यांचे संकल्पनेतून ‘सावली सुरक्षितेची महिला सुरक्षा जागरूकता’ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आज चांगु काना ठाकूर महाविद्यालय, पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाविद्यालयातील १०० मुली व महिला कर्मचाऱ्यांना सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण देण्यात आले.
गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, पोलीस उपआयुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मानव तस्करी विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला सहाय्यता कक्ष पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, अनैतिक मानवी व्यापार पोलीस निरीक्षक अतुल अहिर यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. यावेळी महिलासोबत होणारे सायबर क्राईम गुन्हयात होणाऱ्या फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली तसेच महिलांवर होणारे अत्याचार, कुटुंबीय अत्याचार, लैंगिक अत्याचार, शोषण याबाबत कायदेशीर माहिती व कारवाई कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा चांगला प्रतिसाद लाभला. अशाप्रकारचे विविध काॅलेज, सोसायटी, ऑफिस मधील महिलांकरीता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुबंई पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!