मोदक स्पर्धेत मधुरा कर्णीक प्रथम
पनवेल : पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये पारंपारीक मोदक स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी भाग घेतला त्यात महिलांसह पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये गणेशोत्सवा निमीत्त ‘पारंपरिक मोदक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी उकडीच्या मोदकासह काजू मोदक, चॉकलेट मोदक, दहिवडा मोदक, फळांचे मोदक, तळलेले मोदक, तिखट मोदक, पानाचे मोदक, थंडाई मोदक आदी नाना प्रकारचे मोदक आकर्षक अशी सजावट करून मांडून ठेवले होते. या कार्यक्रमासाठी कलर्स मराठी वाहिनी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकामध्ये प्रमुख भूमिका करणार्‍या काजल मोरे, बिग बॉस रियालिटी शो मधील अभिनेत्री रुपाली भोसले, यु टर्न वेब सिरीज काहे दिया परदेस मधील अभिनेत्री सायली संजीव आदी उपस्थित होत्या त्यांचे स्वागत ओरायन मॉलच्यावतीने मनन परुळेकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मधुरा कर्णीक, द्वितीय क्रमांक सरीता नेवाळे, तृतीय क्रमांक श्रृती शहा तर उत्कृष्ठ सादरीकरण म्हणून श्‍वेता महेश व नावीन्य पुर्ण आयोजन म्हणून रुपाली पाटील यांना मॉलच्यावतीने बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण विशांत शेट्टी, प्रियांका उदेशी व विजया म्हात्रे यानी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुप्रसिद्ध कुणाल रेगे यांनी केले.

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/58414409_120420859335070_2502283092366983168_n.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/61510464_120420832668406_41587631456256000_n.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/61562858_120419746001848_3806272989209559040_n.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/62266292_120421242668365_4627907414119677952_n.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/65206140_120420762668413_738531923038568448_n.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/69233276_120420342668455_3452471020932300800_n.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

[dimage url=”https://khabarbaat360.com/wp-content/uploads/2019/11/70337476_120421142668375_7497160006974832640_n.jpg” zoom_level=”1″ anim_speed=”1″ control=true] –

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!