पनवेल दि.२७: काळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय पनवेल आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित खुली १६०० रेटिंग खालील पिड बुद्धिबळ स्पर्धा काळण समाज मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून १६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उदघाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काळण समाज मध्यवर्ती अध्यक्ष मनोहर तेरडे, सचिव विजय वनगे, सुखदेव राजे, अशोक राम धरणे, सतीश चंदने, रश्मी काळण, साधना शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते. बुद्धिबळ स्पर्धा खुल्या गटात खेळविण्यात आली. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी काळण समाज कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय पनवेन यांच्यातर्फ स्व शंकरराव यशवंतशेठ साखरे सुवर्णा सतीश चंदनेस्मृती प्रीत्यर्थ फिरता चषक तसेच रोख पारितोषिक लौकिक पांगशे (ठाणे) यांनी पटकाविला. खुल्या गटासह पंधरा, तेरा, नऊ, सात वर्षाखालील गट तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक अशा स्वतंत्र ४३ गटातील विजेत्यांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी पनवेल चेस असोसिएन तर्फे अध्यक्ष गंभीर दांडेकर, उपाध्यक्ष समीर परांजपे, सचिव सी. एन. पाटील, खजिनदार परिणाम मुरे, सल्लागार मंगला बिराजदार, डॉ. प्रीतम म्हात्रे, राजेश खंडागळे, चिंतामणी रामतीर्थकर, विजयकुमार पाटील, स्पर्धा प्रमुख रमेश काळण यांनी नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धा यशस्वी केली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!