पनेवल,दि.9 : महापौर कविता किशोर चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनामुळे टाकाऊ कचऱ्यापासून सुध्दा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेश पालिका क्षेत्रातील नागरिकांना मिळणार आहे. तसेच सुक्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे हे या प्रदर्शनातून नागरिकांना समजू शकणार आहे.
पनवेल महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंच्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!