पनवेल दि.1: दरवर्षी मुंबई, नाविमुंबई परिसरात गणेशोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या सावटामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला नागरिकांनी नियमांचे पालन करीत अगदी साधेपणाने विसर्जन करुन निरोप दिला. नाविमुंबई मध्ये आज शातंतेत विसर्जन पार पडले.
ठिकठिकाणी होणारी भाविकांची गर्दी, वाहतूक कोंडी हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिसणारे दृश्य यंदा पहावयास मिळाले नाही.
अनंत चतुर्दशीनिमित्त सार्वजनिक, खासगी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी कैक पोलीस मनुष्यबळ तैनात होते. भाविकांनी मूर्तीपूजा व आरती घरीच आटोपून घ्यावी. विसर्जनासाठी किंवा विसर्जन सोहळा पाहाण्यासाठी रस्त्यांवर तसेच विसर्जन स्थळांवर गर्दी करू नये. मूर्तीसोबत घराबाहेर पडणाऱ्यांनी मास्क, अंतर पाळावे, असे प्रशासना तर्फे आवाहनही करण्यात आले होते.