पनवेल दि.18: पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार व समितीचे सल्लागार सुनील पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत सन 2020 ते 2021 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी साप्ताहिक रायगड शिव सम्राट वृत्तपत्राचे संपादक रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी दै. सामनाचे पत्रकार संजय कदम, उपाध्यक्षपदी सा. कोकण संध्याचे मुख्य संपादक केवल महाडिक, सचिवपदी दै. पुढारीचे प्रतिनिधी रवींद्र गायकवाड, सहसचिवपदी सा. आर्या प्रहारचे संपादक सुधीर पाटील, खजिनदारपदी दै. रामप्रहरचे हरेश साठे, सहखजिनदारपदी सा. पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे यांची निवड करण्यात आली. या वेळी नव्याने झालेले अध्यक्ष पाटील यांनी मावळते अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
या वार्षिक सभेस जेष्ठ पत्रकार व सल्लागार सुनील पोतदार, दीपक महाडिक, पत्रकार विवेक पाटील, मंदार दोंदे, अनिल भोळे, अरविंद पोतदार, भालचंद्र जुमलेदार, मयूर तांबडे, विशाल सावंत, राजेश डांगळे, सुभाष वाघपंजे, सुनील कटेकर, मनोहर सचदेव आदी उपस्थित होते. या वेळी विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!