पनवेल दि.01: राज्यस्तरीय सातव्या ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइटची एकांकिका ” नातं ” ने बाजी मारत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पटकाविला.  
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हि एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी उपस्थित होते. तसेच सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेक्षाध्यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, सिने अभिनेते संजय नार्वेकर, लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अद्वैत दादरकर, अभिनेत्री ऋतुजा देशमुख, अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, झी २४ तासच्या नवी मुंबई प्रतिनिधी स्वाती नाईक तसेच सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका रुचिता लोंढे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, रविंद्र भगत, स्पर्धा सचिव व नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, स्मिता गांधी, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप, आदी उपस्थित होते .

यावेळी सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मार्गदर्शन करताना, कलावंताला कोणीही हे सांगता कामा नये की तू हे कर, ते कर , हे करू नकोस. कलेने आपल सत्व जपले पाहिजे ही पहिली जवाबदारी लेखकांची आहे. भारत सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनायला हवे असेल तर शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवणे गरजेचे असून त्यासाठी कलावंतांनी मार्गदर्शन करायला हवे. श्रीराम लागू आणि निळू फुले यांनी आयुष्यभर कला कशी जपावी, आपला अभिनय कसा विकसित करावा हे शिकवले , शब्दांचे सामर्थ्य ‘सामना’ चित्रपटातील त्यांच्या जुगलबंदीत पाहायला मिळते. तुम्ही एक एक प्रश्न घेतलात तरी खूप वेगळ्या प्रकारचे लेखन तुमच्याकडून होऊ शकते असे सांगून त्यांनी या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे भरभरून कौतुक करत पोचपावती दिली.
भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेक्षाध्यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी, अटल करंडक स्पर्धेतून सयोजकांमुळे आपल्याला या ७५ एकांकिकातून सकारात्मक ऊर्जा मिळाली. स्पर्धेतून थांबलेली क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली. पण अनेक एकांकीकांमधून नकारात्मकता दिसून येत असल्याची खंत व्यक्त करून त्यांनी आपल्या देशात नकारात्मकता नाही त्यामुळे सकारात्मकता आपल्या स्क्रिप्ट मध्ये असावी असे सांगून अटलजींची एक कविता वाचून दाखवली.

सविस्तर निकाल
एकांकिका : प्रथम क्रमांक-नातं (व्हाइट लाइट, ठाणे) एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-बारस (कलांश थिएटर, रत्नागिरी) 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-कुणीतरी पहिलं हवं (बीएमसीसी, पुणे) 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-घरोटं (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई) 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-स्टार (जिराफ थिएटर, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रथम क्रमांक-योगेश सप्रे, हिमांशू बोरकर (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-अभिजीत मोहिते (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-प्रसाद थोरवे (नातं-व्हाइट लाइट, ठाणे) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-गौरव म्हालदार (घरोट-नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-बॉबी (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; अभिनेता : प्रथम क्रमांक-प्रसाद थोरवे (नातं-व्हाइट लाइट, ठाणे) दोन हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-महेश कापरेकर (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी) 1500 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-अनिल आव्हाड (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-मंदार नेने (कुणीतरी पलं हवं-बीएमसीसी, पुणे) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-स्तिमित साने (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; अभिनेत्री : प्रथम क्र१मांक-गायत्री नाईक (घरोटं-नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-स्नेहा चव्हाण (क्लिक-ओम साई कलामंच, वसई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय-अक्षता टाळे (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-मुग्धा दातार (आर ओके-सीकेटी कॉलेज, पनवेल) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-आरती बिराजदार (बिनविरोध-रंगपंढरी, पुणे) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; संगीत : प्रथम क्रमांक-श्रीनाथ म्हात्रे (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-ऐश्वर्या वटवाल (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-क्षितिज भट, योगेश सप्रे, तन्मय भागवत (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-शुभम ढेकळे, गौतम बहुतले (वण्डरिंग बोट-एमडी कॉलेज, मुंबई) पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-ओंकार सप्रे (क्लिक-ओम साई कलामंच, वसई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; प्रकाशयोजना : प्रथम-श्रीश रत्नपारखी, निनाद जोगळेकर (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-श्याम चव्हाण (वण्डरिंग बोट-एमडी कॉलेज, मुंबई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-साई शिर्सेकर (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई), प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; विशेष पारितोषिके : लक्षवेधी दिग्दर्शन-यश पवार (वण्डरिंग बोट-एमडी कॉलेज, मुंबई), अजय पाटील, मनीष साठे (आरपार-फोर्थ वॉल, ठाणे), लक्षवेधी अभिनेता-अजय पाटील आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), स्वप्नील अंबायत (12 किमी-एएसएम प्रोडक्शन, मुंबई), निखिल गोरे (आर ओके-सीकेटी कॉलेज, पनवेल), विनोदी अभिनेता-संजय गोसावी आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), विशेष संगीत संयोजन-गौरव व शुभम वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), विनोदी एकांकिका (आरपार-फोर्थ वॉल, ठाणे), विशेष लक्षवेधी प्रयत्न-यंदा कर्तव्य आहे, सांघिक अभिनय-घरोटं (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई). सर्वोत्कृष्ट बालकलाकर -ग्रीष्मा पवार (12 किमी-एएसएम प्रोडक्शन, मुंबई), आरुष देवळेकर (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी).
उत्कृष्ट नेपथ्य – प्रथम क्रमांक (कुणीतरी पहिलं हवं)शुभम परखड, कार्तिक किनगे, द्वितीय क्रमांक – (शुद्धता गंरेंटेड) प्रमोद शेलार, तृतीय क्रमांक – (वन्डरिंग बोट) प्रणय निवळकर, यश पवार, चतुर्थ क्रमांक (बारस ) देवशीस भरवडे, हरेश बाणे तर उतेजनार्थ क्रमांक (घरोट )
हेमंत वनगे, अमोल जाधव. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!