पनवेल दि.३० : शिवसेना पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या उमेदवाराबाबत लोकांच्या मनात असलेली चीड मला मावळ लोकसभा मतदारसंघातील शहरी तसेच ग्रामीण मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी कळंबोली येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, भावनाताई घाणेकर, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकापक्षाचे सरचिटणीस गणेश कडू, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमख कल्पना पाटील, रेवती सकपाळ, दीपक घरत, शशिकांत डोंगरे, अनिल नाईक आदींसह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
पनवेल-उरण भागातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत.नैना, जेएनपीटी,बीपीसीएल, सिडको, महानगरपालिका,अनियमित पाणीपुरवठा,पर्यटनाच्या सुविधा असे अनेक विविध प्रश्न हे सुटले गेले नाहीत.आम्ही प्रचारासाठी जात असताना आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून असलेले शिवसैनिक प्रचारासाठी पुढे येत आहेत.तरुण,महिला याही त्याच ताकदीने पुढे येत आहेत.शिवसेनेत गद्दारी झाली आहे,त्या गद्दारांबद्दलची चीड मतदारांमध्ये दिसून येत आहे. अतिशय चांगले वातावरण आहे त्यामुळे आम्ही ही निवडणूक निश्चित जिंकू असे शेवटी मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी सांगितले. आमचा उमेदवार लोकाभिमुख आहे.पनवेल-उरण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण आहे.चांगल्या प्रतिसाद मिळत आहे असे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी सांगितले. गेली दहा वर्षे मतदारांची फसवणूक झाली आहे. मतदारांमध्ये कमालीची चीड आहे. महागाई,पेट्रोल-डिझेल यासारखे प्रश्न सुठलेच नाही. त्यामुळे मतदार यावेळी मोदींना हद्दपार करतील असे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचं नाव द्यावे यासाठी महाविकास आघाडीनेच पुढाकार घेतला असल्याचे शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख बबन पाटील यांनी सांगितले.