उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे) जासई गावातील दत्तात्रेय जनार्दन ठाकूर वय वर्षे 56 यांचा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता जासई गावालगत असलेल्या रेल्वे फाटकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे निधन झाले समजताच जासई ग्रामस्थांतर्फे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन चालू असताना उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कवले यांनी संबंधित वाहन शोधून त्याच्यावर कारवाई करून मयत कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिगोडा दास्तान रोडला अवजड वाहनांची बंदी करावी अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. या आंदोलनासाठी ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, गाव आघाडीचे अध्यक्ष यशवंत घरत, इंटकचे संजय ठाकूर, माजी सभापती नरेश घरत, जासईचे सरपंच संतोष घरत, धर्मा शेठ पाटील, जासई भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य योगिता म्हात्रे, कामगार नेते दत्ता घरत, अमृत ठाकूर, आदित्य घरत, गणेश पाटील, विवेक म्हात्रे, रघुनाथ म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, ठाकूर कुटुंबिय तसेच जासई गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!