पनवेल दि.१६: पनवेल उपजिल्हा रुग्णालया बरोबरच कामोठे येथील एमजीएम हे सुद्धा कोविड रुग्णालय आहे. येथे रायगड जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी एमजीएम हॉस्पिटल ला भेट दिली. त्याठिकाणी डॉ. सुधीर कदम आणि हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. त्याचबरोबर सुरक्षेचे नियम पाळून कोविड वार्ड मध्ये जाऊन तेथील सुविधांची पाहणी केली तसेच कोरोनाग्रस्त नागरिकांशी संवादही साधला.
पनवेल महानगरपालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भाग तसेच उरणला मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणात या आजाराचा संसर्ग झालेला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वात अगोदर पनवेल उपजिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केले होते. येथील सर्वसाधारण ओपीडी पनवेल महापालिकेच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आली. त्याचबरोबर प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना कळंबोली एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात येते. वाढत्या रुग्णांचा विचार करता एमजीएम रुग्णालय सुद्धा कोविड हॉस्पिटल जाहीर करण्यात आले. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे दररोज रुग्ण जिल्ह्यातून येत आहेत. या रुग्णालयातून काहीजण बरे होऊनही घरी गेले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिकची काय व्यवस्था करावी लागेल, उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी या व इतर गोष्टींची चर्चा करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी एमजीएम रुग्णालयाला भेट दिली.या दोन्ही आमदारांनी उपचारादरम्यान येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर डॉ. सुधीर कदम, वरिष्ठ डॉक्टर निष्णांत वैद्यकीय कर्मचारी यांचे पथक उत्कृष्ट काम करीत असल्याचे सांगून कामोठे एमजीएम हॉस्पिटल व्यवस्थापनाचे कौतुक केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!