पनवेल दि.२२: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आणि सोनेरी आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी रात्री ०८ वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘मेरी आवाज हि पहचान है’ या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा, भारत विकास परिषद, रंगनिल संस्था, रंगरचना कलामंच, संस्कार भारती पनवेल समिती आणि पनवेल कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सामगंध कलाकेंद्र पनवेल हे सादरकर्ते आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मोफत प्रवेशिका अमोल स्टेशनरी, टिळक रॉड पनवेल (संपर्क क्रमांक ९८२०२३३३४९) येथे उपलब्ध करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!