लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केल्या अधिकार्‍यांना सूचना
पनवेल दि.३०: पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील साडेबारा टक्के भूखंडांसंदर्भात तसेच सिडकोमार्फत येत्या काळात विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहे त्यांची नुकसानभरपाई, पुनर्वसन व पुनर्स्थापना याबाबत मंगळवारी सिडको अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
गव्हाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उद्योजक जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते रघुनाथ घरत, भाऊशेठ पाटील, सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, रोशन म्हात्रे, पंकज म्हात्रे, हेमंत पाटील, ज्येष्ठ नेते रतनशेठ भगत, अशोक कडू, वामनशेठ पाटील, अनंता ठाकूर, जयवंत देशमुख, भाऊ भोईर, अजय भगत, सुहास भगत, सुनील पाटील, सिडकोचे अधिकारी अनिल देशमुख, मेट्रो उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत ग्रामस्थांनी सिडकोमार्फत साडेबारा टक्के भूखंडाची नुकसानभरपाई मिळण्याबाबात होणारी दिरंगाई तसेच पुनर्वसनासंदर्भात संतप्त भावना व्यक्त केल्या.
याच प्रश्नावर लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकार्‍यांना जाब विचारला. सिडको गव्हाण विभागातील ज्या जमिनी येत्या काळात संपादित करणार आहेत त्या जमिनींचा मोबदला शेतकर्‍यांना १८ महिन्यांच्या कालावधीतच दिला पाहिजे, अशी प्रमुख मागणी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली. ग्रामस्थांच्या सर्व समस्यांबाबत लवकर बैठक घेण्यात येणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!