रत्नागिरी दि.६ रिफायनरी प्रकल्प समर्थनार्थ आज राजापूर येथील धोपेश्वर मध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्याला राजापूर मधील सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा व समर्थन मिळाल्याने स्थानिकांचा सुरवातीचा विरोध मावळल्याचे चित्र कोकणवासियांना पहायला मिळाले. धोपेश्वर रिफायनरी ही कोकणच्या विकासाची गंगा असल्याचे मेळाव्यात जाहीर करण्यात आले. नाटे धाऊलवल्ली सरपंचासह प्रत्येक गावातील स्थानिकांनी मेळाव्याचे समर्थन केले. आज रिफायनरी समर्थनासाठी एलगार पुकारण्यात आला. मेळाव्याला प्रचंड मोठी गर्दी होती, यावरून कोकणात सर्वच पक्षांच रिफायनरी बद्दल मत बदलल्याचे दिसुन आले. चोख पोलीस बंदोबस्त व दंगल नियंत्रण पथक कडेकोट बंदोबस्तावर होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!