माथेरान दि.२९ (मुकुंद रांजणे) शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या शाळेतील नादुरुस्त स्वच्छता गृहाचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नसल्याने याचा शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य कष्टकरी लोकांची मुले या शाळेत शिकत असून पावसाळ्यात लहान लहान मुलांना स्वच्छता गृहाच्या दुरुस्तीच्या कामामुळे याचा वापर करता येत नसल्याने पावसातून सार्वजनिक शौचालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. डिसेंबर महिन्यापासून सुरू असलेले स्वच्छता गृह दुरूस्तीचे काम अजून ही अपूर्ण अवस्थेत आहे. नगरपरिषदेच्या अखत्यारीत सर्व कामगार यंत्रणा कार्यरत असताना देखील शाळे सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अपूर्ण कामांत दिरंगाई केली जात असल्याने पालक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच सभागृहात लोकप्रतिनिधी नसल्याने शाळेतील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित अधिकारी वर्गाने लवकरच शाळेतील विद्यार्थ्यांना भेडसावत असणाऱ्या प्रश्नांची उकल लवकरात लवकर करावी अशी पालक वर्गासह स्थानिकांमधून मागणी होत आहे.
या बाबत नगरपरिषद शाळा माथेरान, शाळा शिक्षण समिती अध्यक्षा ज्योती सुरेश शिंदे यांनी सांगितले कि स्वच्छता गृहाची कामे अद्यापही पूर्ण झाली नसल्याने लहान मुलांना टॉयलेटला जाण्यासाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो पण पावसाळा सुरू असल्याने थंडीत ऐनवेळी मुलांची कपड्यातच लघवी होते. स्वच्छता गृहांची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी यासाठी संबंधीत अधिकारी वर्गाची आम्ही पालक वर्ग दोन दिवसांत भेट घेणार आहोत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!