मुंबई दि.२१: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बाराविच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 94.83 टक्के लागला. मुंबई विभागात रायगड अव्वल आहे. सलग दुसर्‍या वर्षी रायगड मुबई विभागात अव्वल आला आहे. यंदा देखेली उत्तीर्ण होण्यात मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. तळा आणि म्हसळा या दोन तालुक्यांधील शंभर टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा रायगडचा निकाल तीन टक्क्यांनी वाढला आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यात 29 हजार 468 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 29 हजार 346 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी 27 हजार 831 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्यात मुलींना मुलांना मागे टाकले आहे. 14 हजार 860 मुले परीक्षेला बसले होते. त्यातील 13 हजार 778 मुले उत्तीर्ण झाली. 92.71 मुले उत्तीर्ण झाली. 14 हजार 486 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यातील 14 हजार 53 मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तर्णी होण्यात मुलींची टक्केवारी 97.01 आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!