पनवेल दि.१७: कोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली मंदिरात सोमवारी महाआरती भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखेर खुली करण्यात आली. याचा आनंदोत्सव म्हणून सोमवारी सायंकाळी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात महाआरती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत जवळपास सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरू झाले असताना देव मात्र मंदिरात बंदिस्त होते. त्यामुळे भाजप तसेच विविध संघटनांनी मंदिरे खुली करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर राज्यातील मंदिरात सोमवारी महाआरती झाली. याचा आनंद साजरा करण्यासाठी पनवेलमधील विरुपाक्ष मंदिरात सोमवारी महाआरती आयोजित करण्यात आली होती. या महाआरतीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, संदीप लोंढे यांच्यासह मंदिराचे विश्वस्त व भाविक उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!