पनवेल दि. ०१: आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांनी त्यांच्या मातोश्रींचा ७ वा स्मृतीदिन “चला नाती जपुया” हा संदेश देत मंगळवारी साजरा केला. आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्मृतीदिन साजरे केले जातात. पण धनराजजी विसपुते यांचा नेहमी एकच प्रयत्न असतो तो म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीतून समाजाला काहीतरी उपयोग झाला पाहिजे व सामाजिक विकासात आपले काहीतरी योगदान असले पाहिजे आणि याच हेतूने त्यांनी आपले विद्यार्थी, सर्व कर्मचारी आणि देवद- विचुंबे येथील रहिवासी यांच्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्त्या ज्या भारतीय कुटुंब पद्धती आणि नाती यावर अगदी आत्मीयतेने मार्गदर्शन करतात अश्या मा.अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले. प्रस्तुत कार्यक्रमात अपर्णाताईंनी “चला नाती जपुया” या विषयावर सर्वाना मार्गदर्शन केले , आजकालच्या मुलांची विचारसरणी आणि आई वडिलांची बदलती भूमिका यावर भाष्य करत सर्वांच्या विचारांना एक वेगळी दिशा दिली. या वेळी धनराजजी विसपुते यांनी आपल्या आईच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली , या नंतर वंदनाताई सोनार यांनीही आईला श्रद्धांजली अर्पण केली. बी.एड.विभागाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या सुत्रसंचालनातून आईंच्या अनेक आठवणी जागृत करत सर्वांचे आभार मानले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!