आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण
पनवेल दि.१२: सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात उभारण्यात आलेल्या लॉन टेनिस व बँडमिंटन कोर्टचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.
या कार्यक्रमाला सभागृहनेते परेश ठाकूर, प्रसिद्ध नेत्रतज्ञ् डॉ. सुहास हळदीपुरकर, नगरसेवक अनिल भगत, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, मनोहर मुंबईकर, सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमीत झुंझारराव, चिन्मय समेळ,यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या मंडळाच्या माध्यमातून कलाकार, विद्यार्थी, तसेच खेळ आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते, त्या अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात बॅडमिंटन व लॉन टेनिस कोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे.