कोणत्याही काव्य, गीत, गजल या विधांमध्ये गायन कलेला विशेष महत्व आहे. गेय साहित्य रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी गायन क्षेत्राचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे. मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलचे दोन दिवसीय ९वे अखिल भारतीय संमेलन नोव्हेंबर २०१७ रोजी नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या अमोल देशमुख यांच्याशी केलेली खासबात.