पनवेल दि.१३: रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना करणारे घोषवाक्य घेऊन ‘नमो खारघर मॅरेथॉन २०२४’ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रविवारी दिनांक १४ रोजी खारघर धावणार आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक’ स्पर्धा होणार आहे. त्यानुसार पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या अंतर्गत रविवारी सकाळी ०५ वाजता ‘नमो खारघर मॅरेथॉन’ असून या स्पर्धेला खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरुवात होणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या होणाऱ्या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख तर सन्माननीय उपस्थिती म्हणून आमदार महेश बालदी, प्रवासी संघाचे (एनजीओ) अध्यक्ष तरुण राठी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सेलिब्रिटी जया जुगल परमार यांची उपस्थिती लाभणार आहे. तर सायक्लोथॉनला खारघर सायकलिंग क्लबच्या अँम्बेसिडर राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या स्नेहल माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फोर निर्भय भारत’, ‘सदभावना दौड’, ‘एक धाव पाणी बचतीसाठी’, ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’, ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’, ‘हम फिट तो इंडिया फिट’, ‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ अशी घोषवाक्य घेवून यशस्वीरित्या उत्कॄष्ठ आयोजनाने स्पर्धा पार पडल्या आहेत.
सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची हि स्पर्धा १४ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर अशा आठ गटात हि स्पर्धा होणार असून या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेचा क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे चेअरमन परेश ठाकूर, जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, खारघर भाजपचे अध्यक्ष प्रवीण पाटील, खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी केले आहे.

              - बक्षिसांचा तपशिल - 

 पुरुष खुला गट (फक्त रायगड जिल्हा) - अंतर १० किलोमीटर

प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट.

 महिला खुला गट (फक्त रायगड जिल्हा) - अंतर १० किलोमीटर

प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक – १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट.

 १७ वर्षाखालील मुले गट (फक्त रायगड जिल्हा)- अंतर ०५ किलोमीटर

 प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. 

 १७ वर्षाखालील मुली गट-(फक्त रायगड जिल्हा) अंतर ०५ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

१४ वर्षाखालील मुले गट-(फक्त रायगड जिल्हा) अंतर०५ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

१४ वर्षाखालील मुली गट-(फक्त रायगड जिल्हा) अंतर ०५ किलोमीटर

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

 विशेष आकर्षण खारघर दौड - अंतर ०३ किलोमीटर 

 स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.

 सिनिअर सिटीझन दौड - अंतर ०२ किलोमीटर 

प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!