महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल मधील गुजराती शाळा मैदान या ठिकाणी रायगड सरस-विक्री व प्रदर्शन 2020 कार्यक्रमाचे आयोजन दि. १० ते १३ जानेवारी या कालावधीमध्ये करण्यात आले होते. यामध्ये रायगड जिल्ह्यासहित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व जळगाव येथील 60 स्वयंससहाय्यता समूहांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःबनवलेल्या आकर्षक, शोभिवंत तसेच गृह्योपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीस आणले होते. त्याचप्रमाणे स्वादिष्ट खानावळीची लज्जत चाखण्याची उत्तम संधी खवय्यांना येथे उपलब्ध झाली. तसेच या प्रदर्शन खास आकर्षण म्हणून भारतातील सर्वात मोठा 11 फूट लांबीचा व सात फूट उंचीचा 1000 किलो वजन असलेला बैल पाहण्यास मिळाला.