पनवेल दि.8: आयुक्त गणेश देशमुख यांचा मोठा निर्णय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने आज हा निर्णय घेण्यात आला आहे. कामोठेचे क्षेत्रफळ 2.76 चौ.किमी आहे. लोकसंख्या 1.13 लाख आहे. तसेच येथे आजअखेर 54 आहेत. एकूण महानगरपालिका क्षेत्रात 138 पैकी 40% रूग्ण एकट्या कामोठ्यात आहेत.
त्यामुळे कामोठे बाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी सदरचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यापूर्वी त्या त्या भागातील इमारती करण्यात येत असत परंतु कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सदर भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल अपवाद फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा व पोलीस इ. कामे करणारे नोंद करून जाऊ शकतील.