पनवेल दि.०२: राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पूर्ण केलेल्या भारत जोडो ३५०० किलो मिटरच्या पदयात्रेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहुलजींच्या सोबत चालणाऱ्या रायगडची सुकन्या नंदाताई म्हात्रे यांचा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी काश्मीर येथे दिनांक 30 जानेवारी रोजी भारत जोडो पदयात्रेची सांगता झाल्यावर महाराष्ट्राच्या परंपरेनुसार साडी व काँग्रेसचे चिन्ह असलेली अंगठी देऊन सन्मान केला. नंदाताईचा रायगड वासियांना सार्थ अभिमान असल्याच महेंद्र घरत यांनी सर्व भारत जोडो यात्री समोर म्हटलं.
रायगड काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी काश्मीर मध्ये सर्व भारातयात्री समोर केलेल्या सन्मानाने भारावून भारत यात्री नंदाताई म्हात्रे म्हणाल्या की, दादा तुम्ही काँग्रेससोबत अगदी भावनात्मक जोडलेले आहात आणि भारत पदयात्रींसोबत प्रत्येक काँग्रेसीच एक भावनात्मक व आत्मीयतेच नातं ह्या यात्रेदरम्यान वारंवार दिसून आल. ह्या यात्रेदरम्यान अनेक राज्यात आमचा सन्मान केला परंतु आज आपण सर्व भारतयात्रींच्या उपस्थितीत माझा सन्मान केलात आणि रायगड जिल्याचे जिल्हाध्यक्ष म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचे नेतृत्व व पालकत्व आपण मोठ्या आत्मीयतेने सांभांळताय, खरं तर हा फक्त माझा सन्मान नसून जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकत्यांचा सन्मान आहे अस मी समजते त्याकर्ता मी आपल्याला धन्यावाद देते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!