पनवेल,दि.29 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जेष्ठ नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लस महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. इन्कोव्हॅक लसीकरण आज शनिवारपासून पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे.

ही लस नाकावाटे देण्यात येणार असून, ६० वर्षांवरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन सहा महिने झाले आहे अशा जेष्ठ नागरिकांनाच मिळणार असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आंनद गोसावी यांनी दिली आहे.

या लसीसाठी पूर्वीप्रमाणेच आधी कोविन ॲपवरती नोंदणीकरावी लागणार आहे. महानगरपालिकेच्या 9 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 20 डोस व 4 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रासाठी प्रत्येकी 10 डोस शासनाकडून पुरविण्यात आले आहे.

मार्च २०२० मध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली, तर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत पहिल्या डोसचे १०९ टक्के, दुसऱ्या डोसचे १०२ टक्के लसीकरण पुर्ण झाले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!