पनवेल दि.१५: भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवार दि.14 रोजी झाले. या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राजकारण म्हणजे दुकान, गुन्हेगारी असा अर्थ काढला जातो, परंतु त्याला विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळे स्वरूप देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न खाऊंगा और न खाने दुंगा ही संस्कृती देशात निर्माण करून देशाला भयमुक्त करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास रायगडचे माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक नितीन पाटील, हरेश केणी, मनोज भुजबळ, बबन मुकादम, विकास घरत, अभिमन्यू पाटील, मुकीद काझी, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, नगरसेविका चारुशीला घरत, सीता पाटील, दर्शना भोईर, सुशीला घरत, पुष्पा कुत्तरवडे, अनिता पाटील, रूचिता लोंढे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, उपाध्यक्ष अनुपा मोरे, जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम, युवा नेते समीर कदम, तानाजी खंडागळे, सुभाष कदम, प्रदीप देशमुख, देवीदास केळकर, राजन पिल्ले, सुनील सिन्हा, महेंद्र पाटील, हॅप्पी सिंग, सुशील मेंगडे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!