पनवेल,दि.21: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने रोहिंजण, पालेखुर्द, भिंगारी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ,खारघर सेक्टर 12, कोयनावळे, पडघे, टेंभोंडे येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकुर, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिका, आयुक्त गणेश देशमुख, आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे सहाय्यक संचालक डॉ. चाकुरकर, उपायुक्त सचिन पवार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक,माजी नगरसेविका उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी सुविधा देणेकामी 06 सोनोग्राफी सेंटर सोबत सामंजस्य करार करण्यात आले. याच बरोबर गरोदर मातांमधील रक्तक्षय असलेल्या मातांना मोफत रक्त व रक्तघटक देण्याच्या दृष्टीने 02 रक्तपेढी सोबत सामंजस्य करार करण्यात आले. तसेच संशयित क्षयरुग्णांचे मोफत डिजिटल एक्स-रे चाचण्या करणेकामी 05 एक्स-रे सेंटर सेाबत सामंजस्य करार, पालिका हद्दीतील पॅथालॉजी सेंटरची ऑनलाईन नोंदणी करिता नविन संकेतस्थळाचे प्रक्षेपण, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मशीनद्वारे निदान करणाऱ्या सेवा पुरवठाधारकाशी सामजंस्य करारमुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले. तसेच यावेळी पालिका हद्दीतील पॅथालॉजी सेंटरची ऑनलाईन नोंदणीच्या संकेतस्थळाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!