“निलेश पाटील यांच्याकडून अधिकाधिक समाजकार्य घडो” लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली सदिच्छा
पनवेल दि.४: पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये जनसेवा कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले, तसेच या कार्यालयाला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदीच्छा भेट दिली.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले की, निलेश पाटील हे २००५ पासून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सोबत आहेत. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत निलेश पाटील सतत कार्यरत होते. ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जवळचे कार्यकर्ते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी निलेश पाटील प्रयत्नशील असतात. या कार्याची पोचपावती नागरिकांकडून मिळत असते. जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी नवीन कार्यालय उभारले आहे. असेच समाजकार्य त्यांच्या हातातून घडो या आमच्या शुभेच्छा. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही निलेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शहरातील टपाल नाका येथे सुनीता पाटील कॉम्प्लेक्समध्ये जनसेवा कार्यालय सुरू करण्यात आले. त्याच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक के. डी. म्हात्रे, अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, मुकीद काझी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी, संजय जैन, संदेशशेठ म्हात्रे, वैभव म्हात्रे, संतोष गुजरे आदी प्रभाग 19मधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निलेश पाटील यांचा मित्रपरिवार, कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी त्यांना नवीन कार्यालयाबद्दल शुभेच्छा दिल्या.