उरण दि.11: कोरोना कोविड १९ ने उरण करंजा गावात आज २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
काल रविवारी 21 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, आणि आज 27 रुग्ण हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे रायगड जिल्ह्याच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
एका वृद्ध महिलच्या मृत्यूनंतर काही दिवसात तिचे पती सुद्धा मरण पावले होते. यानंतर त्यांच्या 43 वर्षीय मुलाची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला होता. यामुळे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या तपासण्या केल्या असता पाहिले 21 आणि आत्ता 27 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसात 48 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने उरणसह रायगड जिल्ह्याची चिंता वाढली आहे.