अलिबाग, दि.24 : जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना करोनाची लागण झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 64 जणांना करोना लागण झाली असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 19 रुग्णांनी करोनाला हरवून माणसाची जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या 19 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. दुर्देवाने 2 जणांचे जगण्याचे प्रयत्न असफल झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात करोना बाधित व्यक्ती एकूण 43 आहेत.
लॉकडाऊनच्या अगोदर जिल्ह्यात अनेक चाकरमानी दाखल झाले. त्यातील 562 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने काही प्रमाणात करोनाला थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका हद्दीत 28, पनवेल ग्रामीण-4, उरण-4, श्रीवर्धन-5, नेरळ (कर्जत)-1 तर पोलादपूर -1 अशा एकूण 43 करोना बाधितांवर मुंबई फोर्टिज हॉस्पिटल, मुलुंड- 3 (उत्तम),‌ उपजिल्हा रुग्णालय पनवेल-23 (उत्तम), नवी मुंबई मनपा रुग्णालय, वाशी- 2 ( 1 गंभीर, 1 उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई – 1 (उत्तम), जोगेश्वरी रुग्णालय मुंबई- 1 (उत्तम), अपोलो रुग्णालय बेलापूर – 1 (गंभीर), सायन रूग्णालय मुंबई- 1 (उत्तम), जगजीवन रुग्णालय मुंबई -1 (उत्तम), डी वाय पाटील रुग्णालय नवी मुंबई – 1 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय कामोठे – 5 (उत्तम), वेदांत रुग्णालय ठाणे- 1 (उत्तम), फोर्टीज रुग्णालय नवी मुंबई – 2 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-1 (उत्तम) अशा एकूण 43 करोना बाधित व्यक्तींचे विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणा, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि रायगडकर जनता या सर्वांच्या एकजुटीतून जिल्ह्यात करोना विरुद्धची लढाई यशस्वी होताना दिसत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!