मावळ दि.१४: पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूल मध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. नंदाताई तुळसे या मागील अनेक वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहेत.
आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आगामी काळात काम करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे हा विचार त्यांना मनात सतत येत होता.
प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो असे डॉ. किरण यांनी सांगितले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!