कोणतेही शासकीय मदत, योजना शेतकऱ्यां पर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी.
उरण दि 21(विट्ठल ममताबादे) ऐनवेळी संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणातही अतिवृष्टिमुळे फळबाग तसेच भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पाउस, वादळवारा,अतिवृष्टिमुळे हाताला आलेले पिक नष्ठ झाल्याने कोकणातील शेतकरी, बागायतदार वर्ग खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गाव पातळी वरिल कोतवाल तलाठी,ग्रामसेवक यांनीही पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळन्यात खूप मोठी अडचन निर्माण झाली आहे. शासनाच्या कोणत्याही योजना,अनुदान सर्वसामान्य शेतकऱ्यां पर्यंत पोहोचत नसल्याने कोकणातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या उदासीन धोरणा विषयी तीव्र संताप व्यक्त केले आहे.
पावसामुळे, अतिवृष्टिमुळे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर, पिरकोन, सारडे, वशेनी, गोवठने, कोप्रोलि,भेंडखळ,पागोटे, नवघर, जासई,चिर्ले, धुतुम, मोठी जुई, दिघोड़े, जसखार, करळ, सोनारी फुंडे, बोकडविरा,नवीन शेवा, मुळेखंड,करंजा, बोरी, भवरा,मोरा, नागाव, केगाव, आवरे, डोंगरी, पाणजे,पाणदिवे,खोपटा,चानजे,
राजंनपाडा,कलंबुसरे,घारापुरी आदि ग्राम पंचायत हद्दीतील गावे, वाडि वस्ती आदि विविध भागात भातशेती व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी तलाठी व ग्रामसेवक पंचनाम्यासाठी शेतावर, बांधावर पोहोचले नसल्याने व आपला कारभार कार्यालयात बसुनच करत असल्याने तसेच तलाठी, ग्रामसेवक आदि शासकीय कर्मचा-यांवर कोनाचेच वचक नसल्याने तलाठी ग्रामसेवक आपल्या मर्जी प्रमाणे वागु लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मीळना-या आर्थिक नुकसान भरपाई बाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हाताला आलेले पीक अतिवृष्टिमुळे नष्ट झाल्याने आता शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे. शासन कोनत्याच समस्यांची दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना आत्महत्तेशिवाय कोनताच पर्याय उरला नसल्याचे उरण तालुक्यातील कोप्रोलि येथील शेतकरी दुर्लभ हसुराम पाटिल, कुमोदिनी दुर्लभ पाटिल, रमेश चंद्रेश्वर पाटिल यांनी सांगितले.
अतिवृष्टिमुळे उरण तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. हाती आलेले म्हणजेच तयार झालेले पिक ऐन वेळी वाया गेले. पावसाच्या पाण्यामुले भात शेती कुजली, फळे भाजपाला कुजली, त्याला दुर्गंधी येवु लागली. मात्र लाखोंचे नुकसान झाले तरीही एकहि खासदार अथवा मंत्री उरण तालुक्यात आलेले नाही. याचे तीव्र दुःख शेतकऱ्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री सोलापुर दौरा करून आले तर शरद पवार यांनी मराठवाडा दौरा केला मग रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहेत.मंत्री, नेते लोक यांचा दौरा रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात का नाही ? असा सवाल सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नेहमी उरण तालुका प्रत्येक बाबतीत उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे आताही बळीराजाच्या पदरी शेवटी घोर निराशाच पदरी पडला आहे. त्यामुळे उरण मधील शेती व शेतकरी आता दोन्ही आर्थिक संकटात सापडले आहेत.