पनवेल दि.१८: नुकत्याच पार पडलेल्या नागपूर फर्स्ट फाउंडेशन द्वारा आयोजित ग्लोबल नागपूर अवॉर्ड (श्रेणी – कला व संस्कृती) या सन्मानाने विदर्भपुत्र विराग मधुमालती वानखेडे यांचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विराग मधुमालती यांनी ५ वेळा संगीत क्षेत्रात जागतिक विश्वविक्रम नोंदणीत आपल्या भारत देशाचे नाव उंचाविले आहे.
त्यांनी हे सर्व विश्वविक्रम नेत्रदान व अवयवदानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी केले आहेत. शिवाय दिव्यांगांचे दुःख जाणून इतरांना नेत्रादानासाठी प्रेरित करण्यासाठी १०० दिवस आपले डोळ्यांना काळी पट्टी बांधून अंधारमय जीवन व्यतीत केले.
यावेळी सांसद अजय संचेती, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त प्राजक्ता वर्मा, Mrs Deshpande (Co-Founder, Persistent Systems), Nidhi Pundhir (Director – HCL) व नागपूर फर्स्ट फाउंडेशन चे हकिमुद्दिन अली, दिनेश जैन, अमित वायकर, सचिन जहागीरदार, अनिकेत झा, हेमंत लोढा, फैज वाहिद, तन्वीर मिर्झा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!