पनवेल दि.२७: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शनिवारी नवीन पनवेलमध्ये आरोग्य शिबिर आणि खांदा कॉलनीत वृक्षारोपण आयोजित करण्यात आलेे होते.
सेवा पंधरडवड्यानिमित्त नवीन पनवेल सेक्टर 2 येथील कर्नाटक हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. शिबिरात ब्लड प्रेशर, ईसीजी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक गरजूंनी याचा लाभ घेतला.
या शिबिरावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारूशीला घरत, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समितीचे माजी सभापती समीर ठाकूर, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, उद्योजक महेंद्र वावेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
भाजप महिला मोर्चा पनवेल व खांदा कॉलनी यांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलनीत झालेल्या या उपक्रमावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, सरचिटणीस निता माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.