पनवेल दि.०१: संपूर्ण रायगड जिल्ह्यातील प्रचलित, दानशूर व कणखर नेतृत्व तसेच सर्वसामान्य लोकांचा आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा गुरुवार दिनांक ०२ जून रोजी ७१ वा वाढदिवस आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना दिर्घायुष्य लाभावे व त्यांची प्रकृती नेहमी उत्तम राहावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी ०१ जून रोजी पनवेल शहरातील सोनी परिवाराच्या मालकीचे श्री मारुती देवस्थान हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण व महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. या उपक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी स्वतः हजेरी लावून यावेळी हनुमानाची आरती केली. यावेळी नगरसवेक राजुशेठ सोनी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, जेष्ठ पत्रकार दिपक महाडिक, पत्रकार विशाल सावंत, पत्रकार शैलेश जोशी, अनुराग वाघचौरे यांच्यासह पत्रकार मित्र असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस पत्रकार मित्र असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष तथा तरुण पत्रकार केवल महाडिक हे वेगळ्या अंदाजात साजरा करत असतात. एक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य नेहमी सुरु असते गतवर्षी त्यांनी ७० कार्यक्रम राबवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण केले. यावर्षी देखील त्यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला.