अलिबाग दि.20: करोना प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे आज रात्री ८ वाजल्यापासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.   
      वेळेच्या निर्बंधासह फक़्त ही दुकाने सुरू राहणार आहेत.
१) किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री- सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री- सकाळी ७ ते ११
५)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी ७ ते ११
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री- सकाळी ७ ते ११
८)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी ७ ते ११
९)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी ७ ते ११
१०)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-
सकाळी ७ ते ११
     मात्र या सर्व दुकानांतून सकाळी ७ ते रात्री ८ वा.पर्यंत कोविड नियमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील..
(स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेईल.)

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!