मुंबई दि.२६: देशभरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देश जल्लोष साजरा करत आहे. अशा वेळी सर्च इंजिन गूगलनेही डूडल साकारुन भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळचेही गूगल डूडल नेहमीप्रमाणेच खास आहे. यात अत्यंत वैशिष्ट्यापूर्णरित्या भारतीय संस्कृत आणि विविधतेत एकतेची झलक पाहायला मिळते.