पनवेल, दि.17 : पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा 2024 गावदेवी प्रिमीयर लीग क्रिकेट स्पधर्र्मध्ये अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यामध्ये देविका जीएस सुपर किंग हा अंतिम विजेता झाला आहे. तर द्वितीय पारितोषिक आर आर स्मॅशर्स या संघाला मिळाले आहे.
शहरातील गावदेवी मंदिर समोरील प्रांगणात यंदाच्या 10 व्या वर्षी 2024 गावदेवी प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटक मठाधीपती सुधाकर घरत, पत्रकार संजय कदम, मनसे संदीप पाटील, आयोजक जीपीएल ग्रुप शंतनु घरत, विकी काळे, ऋतिक बताले, अनुराग घरत, आदेश घरत, जागृत भोईर, अरुण मढवी, अवधूत घरत, ओमी भोपी, हर्षु घरत, पुष्कर भावेश घरत, स्पर्श शेंडे, ओंकार मढवी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत आठ संघ उतरले होते. त्यातील प्रथम विजेेता म्हणून देविका जी एस सुपर किंग, तर द्वितीय विजेता म्हणून आर आर स्मॅशर्स संघाला घोषित करण्यात आले. यावेळी बक्षिस समारंभ शशिकांत घरत, के डी पाटील, कंट्रक्शन विनोद पाटील, मंगेश भोईर,  संदीप पाटील, प्रेमल सुतार, देवांशू प्रभाळे, अभिजीत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!