शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पनवेल दि.१९: भारताच्या जी -२० समिट अध्यक्ष पदामध्ये लोकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरातील आठ विभागात एफ एल एन संकल्पनेवर आधारित रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २० जून रोजी मुंबई विभागाच्या ‘रन फॉर एज्युकेशन रॅली’ चे आयोजन खारघर येथे करण्यात आले आहे.
सकाळी ०७ वाजता खारघरमधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरु होणाऱ्या या भव्य रॅलीच्या उदघाटन सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. किरण पाटील, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, आदी मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लोक सहभागातून हा कार्यक्रम कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली “वसुधैव कुटुंबकम” या ब्रीदवाक्यास अनुसरून Foundational Literacy & Numeracy (FLN) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हा विषय केंद्रस्थानी ठेवून या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, संपूर्ण समुदाय आणि लोकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नियोजित रॅली ०२ किलोमीटरची असून त्यात विविध शाळेतील दोन हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी होवून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयी विविध संदेशाद्वारे जनजागृती करणार आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!