बीड दि.15: शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे बीडहून मुंबईला जात असताना अपघाती निधन झाले होते सोमवारी सकाळी त्यांचा पार्थिव बीडमधील अंत्यदर्शनासाठी शिवसंग्राम कार्यालयात ठेवण्यात आला होता तेथूनच त्यांची अंत्ययात्रा अंत्यसंस्कार स्थळाकडे मार्गस्थ झाली साडेचार वाजता त्यांच्यावर जालना रोड येथील शेतात शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. शेवटचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय या वेळी उपस्थित होता पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेत आपल्या भावना व्यक्त केल्या

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!