पनवेल दि.७: कुंडेवहाळ परिसरात दगडखान परिसरातील तेथील कामगारांच्या मुलांना भेदरलेल्या अवस्थेत मिळालेला भेकर जातीचा प्राणी ‘केअर ऑफ़ नेचर’ सामाजिक संस्थेचे सल्लागार अमोल आंबोलकर यांना समजताच त्यांनी लागलीच वन्यजीवप्रेमी राजू मुंबईकर यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि लगेचच क्षणांचाहि विलंब न करता रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी जाऊन भेदरलेल्या अवस्थेतील भेकराला तेथील मुलांकडून या वन्यजीवप्रेमींनी आपल्या स्वाधीन घेत प्रथमतः याची माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांना कळविली आणि त्या वन्यजीवला पुढे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याच नैसर्गिक जीवन जगता यावं या करीता राजू मुंबईकर, उरण वनपरिक्षेत्र वनविभागातील वनअधिकारी हरिदास करांडे, राजेंद्र पवार, एस.बी.इंगोले या सर्व अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत रानसई वनपरिक्षेत्राच्या जंगलात ह्या मुक्या वन्यजीवाला आपल्या नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करण्या करीता सोडण्यात आले.