पनवेल दि.५: बदलत्या जीवनशैलीमुळे आज डायबिटीज हा आजार एखाद्या महामारीप्रमाणे संपूर्ण जगाला विळखा घालतोय. भारतात याचे प्रमाण खूप तीव्र गतीने वाढत आहे. दर ८ सेकंदाला एक व्यक्ती डायबिटीजमुळे मृत्युमुखी पडत आहे. भारत ही डायबिटीजची राजधानी असून २०१९ साली भारतामध्ये डायबिटीजचे ७२ दशलक्ष इतके रुग्ण आढळून आले. जगभरात वेगाने पसरणाऱ्या या आजाराचे नियंत्रण करण्याकरीता पनवेल, नवीन पनवेल येथे पनवेल महानगर पालिका व ब्रह्माकुमारीज मार्फत मोफत डायबिटीज मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी येथील ३० ते ६० वर्षे वयातील स्त्री पुरुषांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डायबिटीज फ्री – फिट इंडिया – हेल्दी इंडिया /अलविदा डायबिटीज कार्यक्रमाच्या संयोजक डॉ कीर्ती समुद्र व बीके डॉ शुभदा नील यांनी केले आहे. फडके नाट्यगृह, पनवेल येथे शनिवार ७ डिसेंबर २०१९ सकाळी ९ ते सायंकाळी ५.३०वाजेपर्यंत तसेच रविवार ८ डिसेंबर २०१९ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती राजयोगिनी तारादीदी, डॉ. शुभदा नील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. जास्तीत जास्त लोकांनी या मोफत शिबिराचा घ्यावा असे आवाहन डायबिटीज फ्री – फिट इंडिया – हेल्दी इंडिया, अलविदा डायबिटीज कार्यक्रमाच्या संयोजक डॉ कीर्ती समुद्र आणि डॉ शुभदा नील यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क: 022-27452618,022-27467850 / 9892148155, 022-27454069 /70, 022-27460100, Online Registration Visit www.alvidadiabetes.com.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!