पनवेल दि.१५: पनवेल महापालिकेतील ‘अमृत २’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२४ कोटी १७ लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत २० सप्टेंबर पर्यंत शासकीय निर्णय मंजूर होऊन पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल, असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण महापालिका निर्माण झाली आता या महापालिका हद्दीत सर्व पद्धतीच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी देखील त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत योजनेचा फायदा पनवेल महापालिका हत्तीला करून देण्याच्यासाठी पुढाकार घेतला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागात पाणीपुरवठा तसेच सांडपाण्याच्या निचरा करण्यासाठी जसा पुढाकार घेतला आहे त्याच पद्धतीने भविष्यकाळात शहरांमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी अमृत योजनेचा फायदा पनवेल महापालिकेला मिळेल, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे देखील पुढाकार घेतील असा आम्हाला विश्वास आहे, असे परेश ठाकूर यावेळी म्हणाले.
पनवेल महानगरपालिकेच्या ‘अमृत २’ या अभियानांतर्गत चार प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पहिल्या प्रकल्पात, पालिका क्षेत्रातील २९ गावांकरीता होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत माणशी १३५ लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी १५४ कोटी ४९ लाख रूपये मंजूर केले आहेत. दुसऱ्या प्रकल्पानुसार पमपा क्षेत्रातील २९ गावांकरीता मलनि:स्सारण योजनेतील मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे आणि मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्र बांधणे. यासाठी २०६ कोटी ७५ लाख रूपये मंजू करण्यात आले आहेत. तिसऱ्या प्रकल्पानुसार पनवेल शहरासाठी (१५.५० दलली चा) अतिरिक्त एस.टी.पी. प्लांट बांधण्यासाठी ५२ कोटी २० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. चौथ्या प्रकल्पानुसार पमपा क्षेत्रातील पिसार्वे गावातील तलावाचे सुशोभीकरण करणे, गाळ काढणे आणि पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी १३ कोटी ७३ लाख रूपये केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आले आहेत, असेही परेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले. एखाद्या प्रकल्पासाठी केंद्र सरकार जेव्हा निधी उपलब्ध करून देते तेव्हा राज्य सरकारलाही आपला वाटा द्यावा लागतो. आताच्या बदललेल्या परिस्थितीत राज्य सरकारही आपला वाटा देईल. तसेच महानगरपालिकाही आवश्यक तो हिस्सा निश्चितच भरेल, अशी ग्वाहीही परेश ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
विकासाची गंगा पुढे नेण्याच्याच हेतुने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गेले तीन वर्षे रखडलेला अमृत प्रकल्प पुन्हा मंजूर करून घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिकेतर्फे पुन्हा एकदा मी आभार मानतो, असे माजी सभागृहनेते परेश ठाकूर म्हणाले. पनवेल महापालिकेमार्फत हे सर्व प्रकल्प वेगाने राबविले जावेत आणि त्यात कोणताही अडथळा येऊ नये याची खबरदारी आम्ही यापूर्वीच घेतली आहे. हे प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व ठराव आम्ही यापूर्वीच मंजूर केले आहेत. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनासाठी पालिका आणि आम्ही सारे लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करीत राहू, याची मी आपल्याला ग्वाही देतो, असेही परेश ठाकूर यावेळी म्हणाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!